वर्धा : खाद्य तेलाच्या स्वरुपात पाम तेलाचा वापर इतका हानिकारक आणि धोकादायक आहे की, अनेक आजारांनी ग्रस्त होऊन आयुष्यभराचे नुकसान होण्याची शक्यता असते. पामतेल हे शरीराच्या तापमनातही वितळत नाही. त्यामुळे ते धमण्यातच राहून त्यापासून आजारांचा जन्म होतो. दुसरीकडे, बहुतांश हॉटेल्स, रेस्टॉरंट्समध्ये पाम तेलाचाच वापर होतो. जे आरोग्याला अपायकारक ठरत आहे.
इंटरटेकच्या अहवालानुसार मलेशियाने भारतात 16 लाख 90 हजार टन पामतेलाचे आयात केले. जे को, 5.58 टक्क्यांनी वाढले आहे. दुसरीकडे भारतात 16 लाख टन पामतेलाचे आयात करण्यात आले. पामतेल हे भारतात तयार होत नाही. त्याची आयात मलेशिया येथून केली जाते. हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद असल्याचेच तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हॉटेल्स बंद राहिल्याने पाम तेलापासून तयार करण्यात आलेले खाद्यपदार्थ नागरिकांच्या खाण्यात गेले नाही. त्यामुळे त्यांना आजाराची लागण झाली नाही. मात्र, आता हॉटेल्स, रेस्टॉरंट खुले असल्याने त्यातील अनेक ठिकाणी पामतेलाचा वापर सुरू झाला आहे. त्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढळे असून, रुग्णसंख्येत भर पडत आहे, अशी साधार भीती व्यक्त केली जात आहे.
पामतेल हे सर्व तेलांपेक्षा स्वस्त आहे. यापासून तयार खाद्यपदार्थ जास्त दिवस टिकते तसेच वास येत नाही. पदार्थ लवकर खराब होत नाही. काही जण पामतेलाला दुसर्या तेलांमध्ये मिसळून त्याचा वापर करतात. मात्र हेही हानिकारक आहे. अधिक नफा कमविण्याकरिता तसेच पैशाची बचत करण्याकरिता हॉटेल व्यावसायिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालत आहेत.