वर्धा : क्षुल्लक कारणावरून युवकाला शिविगाळ करत लाथबुक्या व हातातील सुरीने मारहाण करून जखमी केले. ही घटना देवळी शहरातील इंदिरानगर वार्ड क्रमांक १६ मध्ये २१ नोव्हेंबर रोजी घडली. यातील फिर्यादीची आरोपीने मजाक केल्याने फिर्यादीने त्यांना शिविगाळ केली. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेले.
परत रात्री १०.३० वाजताच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर येऊन, तू मघाशी आम्हाला जास्तच बोलला, असे म्हणून हर्षल उर्फ चोखा खोकडे याने सुरीने हातावर वार केले तर आकाश करलुके याने शिविगाळ करून लाथबुक्यांनी मारहाण केली. याप्रकरणी रितेश डायरे यांच्या तक्रारीवरून हर्षल उर्फ चोखा खोकडे व आकाश करलुके दोन्ही रा. इंदिरानंगर देवळो यांच्याविरुद्ध देवळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.