वर्धा : अवैधरित्या जनावरे कोंबून वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात होऊन सुमारे १५ जनावरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवार ता. १७ रात्रीच्या सुमारास सिंदी (रेल्वे) नजीक हा अपघात घडला जखमी जनावरांवर वर्ध्यातील करुणाश्रमात उपचार सुरू आहे.
एम.पी. ०४ एचई. ९६६४ क्रमांकाच्या कंटेनरचा एका मालवाहू वाहनाला धडक देऊन अपघात झाल्याचे माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटणास्थळी दाखल झाले. पोलीस दिसताच चालक व वाहनाने तेथून पळ काढला. पोलिसांना कंटेनरमधून आवाज येत असल्याने पाहणी केली असता पाहिले असता ६० ते ७० जनावरे कोंबून असल्याचे दिसून आले.
त्या सर्व जनावरांना वर्ध्यातील करुणाश्रमात दाखल केल्यावर त्यातील १५ जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे दिसून आले. तर ६० जनावरांना करुणाश्रमात ठेवण्यात आले आहे. यातील चार-पाच जनावरांची हालत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी सिंदी रेल्वे पोलीस ठाण्याचे ठाणेदार चंद्रशेखर चकाटे यांनी पंचनामा करून कंंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.
प्रतिक्रीया….
देशभरात गोवंश बचावचा नारा दिला जातो मात्र प्रत्यक्षात त्याची अमलबजावणी होत नाही. मध्यप्रदेशवरुन निघालेला हा कन्टेनर ईतक्या दुर येत पर्यंत कोणाच्याही नजरेत कसा आला नाही. या जनावरांचा अपघातात नाही तर कंटेनरमध्ये कोंबून आनल्याने मृत्यू झाला. कंटेनरचा अपघात झाल्यामुळे यातून कृरपणा सामोर आला नाहीतर गोवंश कत्तलीकरीता नियोजीत स्थळी पोहचले असते.
आशिष गोस्वामी, सचिव पिपल फॉर अँनिमल वर्धा