वर्धा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत संतापलेल्या पतीने एका व्यक्तीच्या ‘पोटात चाकूने भोसकून जबर मारहाण करीत जखमी केले. जिल्हा परिषद उर्दू शाळेसमोर ही घटना घडली. याप्रकरणी आर्वी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जुबेर शहा खालीक शहा याची संतोष टेकाम याच्याशी एका मंदिरात ओळख झाली होती. जुबेर हा फिटिंगच्या वायरचा भाव विचारण्यासाठी बाजारात जात असताना संतोष टेकाम आला आणि मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणून समोर जाण्यास सांगितले. जुबेर हा समोर जात असताना संतोषने माझ्या पत्नीशी तुझे प्रेमसंबंध आहे, असा संशय घेत त्याच्या पोटात चाकू भोसकले. यात जुबेर गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जुबेरच्या तक्रारीवरून आर्वी पोलिसांनी संतोष टेकाम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.