वर्धा : आष्टी तालुक्यातील बोटोणा येथे वडिलांना मारहाण करण्याच्या कारणातून मोठ्या भावाने लहान भावाला काठीने तसेच सळाखीने बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेला लहान भाऊ सुभाष चौधरी (वय 45) यांचा उपचारादरम्यान नागपूरच्या रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तीन आरोपोंना अटक केली आहे.
बोटोणा येथील गणपत चौधरी यांची अशोक चौधरी आणि सुभाष चौधरी ही दोन्ही मुले शेजारी-शेजारी राहत होती. 28 ऑक्टोंबर रोजी वडील गणपत चौधरी हे मोठा मुलगा अशोक याच्याकडे कामानिमित्त गेले होते. तेव्हा लहान मुलगा सुभाष चौधरी याने वडिलांसोबत वाद केला. त्यानंतत शिवीगाळ करून जबर मारहाण केली होती. यावेळी भांडण सोडविन्याकरिता अशोक चौधरी यांची पत्नी लक्ष्मीबाई धावली. रागाच्या भरात सुभाषने लक्ष्मीच्या हातावर काठीचा दणका दिला. ही बाब अशोक चौधरी आणि त्यांच्या मुलांना कळताच त्यांनी घरी येवून सुभाष चौधरी यांना बेदम मारहाण केली होती.
या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सुभाष चौधरी यांना आष्टी पोलिस ठाण्यात आणले. ठाणेदारांनी तात्काळ रुग्णवाहिकेने जखमीला नागपूर येथे उपचाराकरिता पाठविण्याची व्यवस्था केली होती. त्यानंतर सुभाष चौधरीवर उपचार सुरु होता. मात्र, 11 दिवसानंतर सुभाष चौधरी यांचा उपचारा दरम्यान 4 नोव्हेंबरला मृत्यू झाला.
ही घटना आष्टी पोलिसांना कळताच पोलिसांचा ताफा बोटोणा गावात पोहोचला. यावेळी अशोक चौधरी, लक्ष्मी चौधरी यांना अटक केली. तर अशोक यांचा मुलगा गौरव चौधरी याला या आधीच अटक केली होती. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात खुन्याच्या कलमान्वये गुन्हा करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे आणि ठाणेदार लक्ष्मण करीत आहेत.