वर्धा : एसटीच्या संपाला हिंगणघाट आगाराच्या कर्मचाऱ्यांतील आपसातल्या वादात शिवीगाळ तसेच हाणामारीचे वळण लागले आहे. संपात सहभागी असलेल्या चालक आणि वाहकांनी हिंगणघाट आगारात येत कामावर असलेल्या यांत्रिकी कामगारांना शिवीगाळ करून त्याला मारहाणीचा प्रयत्न केला.
यात यांत्रिकी विभागातील डी. डोगे यांच्या हाताला व्हील पान्याने मारहाण झाल्याने जोगे यांनी सांगितले. यावेळी जे कामगार कामावर येतील त्यांचे हाथपाय तोडू, अशा धमक्या दिल्या गेल्याची तक्रार हिंगणघाट आगार व्यवस्थापकांकडे यांत्रिकी कामगारांनी केली. यांत्रिकी कामगार पंकज एन. नगरकर, एस. व्ही. भलावी, यू. डी. बहादुरे हे तेथून पळून गेले. ही घटना विभागीय नियंत्रक, विभागीय सुरक्षा अधिकारी, आगार व्यवस्थापक यांच्या समक्ष घडली असून त्यांनी याबाबत कोणतीच दखल घेतली नसल्याचा आरोपी यांत्रिकी कामगारांनी केला आहे.