दोन गटात राडा! चालल्या लाठ्याकाठ्या अन्‌ चाकू; येळाकेळी येथील घटनेने खळबळ

वर्धा : क्षुल्लक वादातून दोन गटात वाद होवून एका गटातील युवकाला चाकूने तर दुसऱ्या गटातील व्यक्‍तीला रॉड तसेच लाठ्याकाठ्यांसह चाकूने जबर मारहाण करीत जखमी करण्यात आल्याची घटना येळाकेळी येथे घडली. याप्रकरणी सावंगी ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सावंगी पोलिसांनी दिली.

पहिल्या घटनेत अक्षय सुनिल भगत हा किराणा दुकानासमोर बसून असताना विजय इंगळे हा तेथे आला त्याने अक्षयला तु माझ्या मुलीची दुसऱ्या मुलाशी मैत्री का करुन दिली. असे म्हणत वाद करुन चाकुने मारहाण करीत जखमी केले. तर दुसऱ्या घटनेत मनोज भगत, अक्षय भगत, रोश जवादे, सविता भगत, बबन मानकर यांनी विजय समाधान इंगळे याला तुने पोलिसात तक्रार का दिली, असे म्हणत लाठ्या काठ्यांनी तसेच रॉडने विजय इंगळे याला जबर मारहाण केली.

विजयची पत्नी वाद सोडविण्यास मध्यस्थी गेली असता तिला देखील मारहाण करण्यात आली. या दोन्ही घटनेची नोंद सावंगी पोलिसात झाली असून पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. पुढील तपास ठाणेदार बाबासाहेब थोरात करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here