30 नोव्हेंबरपासून गरिबांना मोफत रेशन मिळणार नाही! पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना बंद होणार

वर्धा : पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKY) अंतर्गत गरीबांना नोव्हेंबरनंतर मोफत रेशन मिळणे कठीण आहे. अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी शुक्रवारी सांगितले की, सध्या नोव्हेंबरनंतरही या योजनेअंतर्गत गरिबांना रेशन देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.

गेल्या वर्षी कोरोनाच्या काळापासून गरीब कुटुंबांना केंद्र सरकारकडून मोफत रेशन दिले जात आहे. यावर्षी जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना मार्च 2020 मध्ये सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला ही योजना एप्रिल ते जून 2020 पर्यंत होती. त्यानंतर ते नोव्हेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आली.

अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी शुक्रवारी सांगितले की, अर्थव्यवस्था आता सुधारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार करण्याची कोणतीही योजना नाही. आमची ओपन मार्केट सेल स्कीम (OMSS) देखील यावर्षी चांगली राहिली आहे.

खाद्यतेलाच्या भाववाढीच्या प्रश्नावर ते म्हणाले की, तेलाच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. अनेक ठिकाणी 20, 18, 10, 7 रुपयांपर्यंतची घसरण पाहायला मिळत आहे. शुक्रवारी एक माहिती जारी केली. त्यात म्हटले आहे की, सरकारने क्रूड पाम तेल, कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेलावरील शुल्क कमी केले आहे. यापूर्वी या तेलांवर २.५ टक्के शुल्क होते ते आता रद्द करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here