

वर्धा : पोलीस वेलफेअरच्या वतीने वर्धा शहरातील सिव्हील लाईन भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पेट्रोलपंप उभारला जात. आहे. पेट्रोलपंपाला विरोधा नाही पण जागेला विरोध दर्शवित पेट्रोलपंप हटाव कृती समितीच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यावर अजूनही सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्याने शुक्रवार ५१ व्या दिवशी आंदोलन सुरूच होते.
पोलीस वेलफेअरच्या वतीने उभारल्या जात असलेल्या पेट्रोलपंपाची जागा बदलविण्यात यावी मुख्य मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी विजय आगलावे, मोहन राईकवार, अनोमदर्शी भेसारे, दिनेश वाणी, कपील चंदनखेडे, राज खेडकर, पुरुषोत्तम लोहकरे व आदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात घोषणाबाजी करून पेट्रोलपंपाची जागा बदलविण्याची मागणी रेटली.