शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मास्क बंधनकारक! मास्क नसल्यास दंड आकारणार

वर्धा : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी मास्क हे अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे शासकीय, निमशासकीय कार्यालयात व खाजगी आस्थापनांमध्ये अधिकारी व कर्मचारी तसेच कार्यालयात कामकाजासाठी येणा-या सर्व अधिका-यांना नाव व तोंड पुर्णपणे झाकले जाईल या पध्दतीने मास्क वापरणे बंधनकारक आहे. याबाबत जिल्हाधिका-यांनी आदेश निर्गमित केले आहे.

मास्क वापरासोबतच शासकीय, निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्या लसीकरणाच्या दोन मात्रा पुर्ण झाल्याचे खातरजमा, कार्यालय, आस्थापना प्रमुखांनी करावयाची आहे. दोन्ही मात्रा पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्याववयाचे आहे. ज्या कर्मचा-याचे लसीकरण झालेले नाही त्यांचे नजीकच्या केंद्रावर किंवा आरोग्य विभागाशी संपर्क साधून विशेष लसीकरण सत्र आयोजित करुन लसीच्या दोन्हीही मात्र पूर्ण करावयाच्या आहे.

मास्कचा वापर व लसीकरणावर देखरेख ठेवण्यासाठी विभाग/ कार्यालय प्रमुख यांनी आपल्या कार्यालयात एका अधिका-याला नामनिर्देशित करावयाचे आहे. असे जिल्हाधिका-यांनी आदेशात नमुद केले आहे. शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालयाच्या आवारात अधिकारी, कर्मचारी किंवा अभ्यागत विना मास्क आढळल्यास त्याच्यावर दंड आकारण्यात येणार असून नामनिर्देशित केलेले अधिकारी त्यासाठी सक्षम प्राधिकारी राहतील. दंडाची आकारणी केल्यानंतर पावती दिली जातील. व सदर रक्कम शासन जमा करण्यात यावी असे जिल्हाधिका-यांनी आदेशात नमुद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here