वर्धा : नदी पार करून ये- जा करीत असलेल्या शेतकर्याचा नदीत बुडाल्याने मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील वर्धा नदी पात्रात नमस्कारी परिसरात घटना घडली. ही घटना उजेडात येताच सर्वत्र खळबळ उडाली. तुळशीदास गोविंद कुयटे (वय ५२) रा. टेकोडा असे मृतक शेतकर्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तुळशीदास कुयटे यांची दोन एकर शेती नमस्कारी गोदारी परिसरात आहे.
तुळशीदास हा नेहमी नदीपात्रातूनच शेतात ये- जा करीत होता. कधी नावेने तर कधी पोहून नदीपात्र पार करीत होता. ते २९ ऑक्टोबरला नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. परंतु, उशिरापर्यंत घरी परतले नाही. त्यामुळे गावातील पोलिस पाटलासह त्यांचा शोध घेण्यात आला. परंतु, शोध न लागल्याने तशी तक्रार तळेगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली.
पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर ३० ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता वर्धा नदीपात्रात शोध घेणे सुरू होते. दरम्यान तुळशीदासचा मृतदेह नदी किना- यावरीळ झाडाखाली दिसून आला. ही बाब माहिती पडताच सर्वत्र खळबळ उडाली. पोलिस घटनास्थळी पोहचून मृतदेह बाहेर काढला. शेतात जाताना नदी पार करतेवेळी त्यांचा पाण्यात बुडून दुर्देबी मृत्यू झाला. असा अंदाज आहे. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.