

वर्धा : सततच्या वाढत्या महागाईमुळे दिवसेंदिवस गोरगरीब जनता व सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाल्यामुळे त्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. महागाईला आळा घालवा, या मागणी राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने शिवाजी चौकात आंदोलन करून केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला.
केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेल व गँसच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे सवर्सामान्य नागरिकांचे आर्थिक वेळापत्र कोलमडले आहे. एकीकडे कोरोना तर दुसरीकडे सततची महागाई यामुळे सर्व घटकांचे जीवनमान खालावले आहे. पेट्रोल, डिझेल १०० रुपयांच्यावर गेले आहे. तर गॅसच्या किंमती १ हजारावर पोहोचल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सततच्या होत असलेल्या महागाईला प्रधानमंत्री यांनी दखल घेत महागाईला घालावा व सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आला. शिवाजी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. आंदोलनस्थळी चूल पेटवून केंद्र शासनाचा निर्षेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुरुष ब महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.