

वडनेर : येथील रहिवासी समीर अली सय्यद याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना वडनेर पोलिस ठाणे अंतर्गत घडली. युवकाची प्रकृती चिंताजनक असून तो सावंगी मेघे रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती आहे.
प्रवीण कनोजिया, मानसिक त्रास देत असल्याचा आरोप युवकाच्या नातेवाईकांकडून लावण्यात आला आहे. प्रवीण कनोजिया यांच्या आटा मिलमधे काम करताना छेड़ काढल्याचा आरोप त्या, महिलेकडून करण्यात आला. त्यामुळे समीर सय्यद हा रात्रभर मानसिक तणावात आल्याने त्याने आपल्या राहत्या घरी सकाळी 10 वाजताच्या समारास गळफास घेतला.
सुदैवाने त्याचा जीव वाचला, पण तो गंभीर परिस्थितीत सावंगी मेघे रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याच्या परिवाराकडून प्रवीण कनोजिया आणि संजू कनोजिया याने समीर सय्यद याला मारहाण करून तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला असता समोर सय्यद याने आपली दुचाकी घटनास्थळी सोडून पळ काढला. या भीतीमुळे युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप परिवाराकडून लावण्यात आला आहे. त्यासाठी प्रवीण कनोजिया, संजू कनोजिया यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबियांनी ठाणेदार शेठे यांना लेखी निवेदन देऊन केली. याप्रकरणी अद्यापही गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही.