वर्धा : सावंगी रुग्णालय परिसरात अचाणक दाखल झालेला पाहुणा बिबट हा जंगलात शिकार न मिळाल्याने शिकारीच्या शोधात शहरात आला मात्र या पाहुण्याच्या परिसरात अचाणक झालेल्या आगमनाने सर्वांचीच भांबेरी उडाली हेती. सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर या पाहुण्याला पकडण्यात वनविभाग आणि पिपल फॉर अँनिमलच्या टिमला यश आले होते. त्यानंतर या पाहुण्याला एक दिवसाकरीता पिपरी येथील पशुआश्रम असलेल्या करुणाश्रमात ठेवण्यात आले होते. करुणाश्रमात त्याचा पाहुणचार झाला नंतर त्याला वनविभागाच्या निगराणीत मंगळवार (ता. २६) तिला रात्री नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
शिकारीच्या शोधात असलेला २ वर्षाचा मादी बिबट्या थेट सावंगी मेघे रुग्णालय परिसरात शिरला होता या परिसरात मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्याने नागरीकांच्या जिवीताला धोका होण्याची शक्यता होती. त्यामुळे वनविभागासह पिपल फॉर अँनिमलच्या रेस्क्यू टिमला मोठ्या शिथापीने बचाव कार्य राबवावे लागले.
यावेळी परिसरात बघ्यांनी मोठ्या संखेने गर्दी केली होती नागरीकांची आरडोओरड चालू होतीत अशातच हा बिबट येथील नाल्यात दडून बसल्याने बचाव कार्यात अडथळा येत होता मात्र अत्यंत शिथापीने या बिबट्याला गुंगीच्या इजेक्शनचा मारा करीत जेरबंद करण्यात यश आले होते. त्यानंतर त्याची रवानगी पिपरी येथील करुणाश्रमात रवानगी करण्यात आली. याठीकाणी त्याच्यावर पुढील उपचार आणि वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
करुणाश्रमातील टिमकडून या पाहुण्या बिबटाची विषेश काळजी यावेळी घेण्यात आली विषेशता त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घेत त्याच्यावर देखरेख ठेवण्यात आली होती. त्याने दिवसभर या करुनाश्रमात आराम करीत मटनावर ताव मारला त्यानंतर पशुवैद्यकिय अधिकार्याच्या टिमने संपुर्ण तपासण्या केल्यानंतर या मादी बिबट्याला खरांगणा वनपरिक्षेत्राच्या हद्दीत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवार (ता. २६) रात्री २ वाजताच्या सुमारास सुखरुप त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. त्यावेळी या बिबटाने पिंटरा उघडताच जंगलात धुम ठेकली.
यावेळी वनविभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपवनसैरक्षक राकेश शेपट, साहायक उपवनरक्षक श्री बोबडे, मानद वन्यजीवरक्षक संजय इंगळे तिगावकर, पिपल फॉर अँनिमलचे सचिव आशिष गोस्वामी, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री खेडकर, वनरक्षक श्री पुडके व वनविभागासह पिपल फॉर अँनिमलची चमु यावेळी उपस्थित होती.