

वर्धा : रस्त्याच्या वादातून एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या चुलत भावांमध्ये शेतातील रस्त्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत मधुकर खराबे याचा जागीच मृत्यू झाला होता. तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली होती. याप्रकरणातील पाच आरोपींना शनिवार ३० रोजीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश सेलू न्यायालयाने दिला.
मधूकर खराबे याला अगदी क्षुल्लक कारणातून सुरेश खराबे, मंगेश खराबे, कुनाल खराबे यांनी मारहाण करीत हत्या केली होती. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता तिघांना ३० रोजीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. तर पत्नी सुनंदा व मुलीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती सेलू पोलिसांनी दिली.