

पवनार : पवनार ते वाहितपूर मार्गाला जोडणाऱ्या पुलाचे काम पाच वर्षापूर्वी मंजूर झाले होते. गेल्या तीन वर्षांपासून या पुलाचे काम सुरु आहे. परंतु अद्यापही ३० टक्के काम पूर्ण न झाल्याने शेतकर्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथील शेतकरी संतापले आणि पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी आज भाजपा किसान मोर्चाच्या वतीने आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या नेतृत्वात पवनार येथील बस्थानक परिसरात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलनात खासदार रामदास दडस यांची उपस्थिती होती यावेळी त्यांनी हे सरकार लूटारुंचे आहे त्यामुळे अनेक मंजूर कामे रखडलेली आहे. आलेला निधी परत जात असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला. येथील बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकऱ्यांनी आंदोलनाला भेट देत पवनार ते वाहितपूर पुलाचे काम मार्च महिन्यापर्यत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
येत्या चार महिन्यात पुलाचे काम पूर्ण न झाल्यास पवनार ग्रामवासीयाकडून यापेक्षाही तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.
आंदोलनात आमदार डॉ. पंकज भोयर, खासदार रामदास तडस, सरपंच शालिनी आदमने, माजी सरपंच अजय गांडोळे, शेतकरी दुशांत खोडे, भाऊराव उमाटे, अमोल उमाटे, नाना खेलकर, अरुण उमाटे, रामराव भोयर, मुरलीधर वैद्य, विवेक काळे, शामराव उमाटे, पंकज खेलकर आदी शेतकऱ्यांची, गावातील नागरिकांची उपस्थिती होती.