मॉर्निग वॉकला जाणाऱ्या व्यक्तीस ट्रकने चिरडले! बोरगाव चौकातील थरारक अपघात

वर्धा : मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीस अज्ञात ट्रकचालकाने हयगयीने वाहन चालवून दोन्ही पायावर ट्रक नेत चिरडले. या अपघातात व्यक्तीचा नागपूर येथील रुग्णालयात उपचारांदराम्यान मृत्यू झाला. हा अपघात बोरगाव चौकात झाला.

अशोक कांबळे (रा. गणेशनगर) हा मजुरी काम करीत असून, तो शनिवारी सकाळच्या सुमारास फिरायला गेला होता. दरम्यान, अज्ञात ट्रकचालकाने निष्काळजीपणे ट्रक चालवून अशोकला मागाहून धडक देत त्याच्या दोन्ही पायांवरून ट्रकचे चाक नेले. रक्तबंबाळ अवस्थेत अशोक परिसरात असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली पडून होता. नागरिकांनी धाव घेतली असता ट्रकचालकाने अपघात स्थळावरून पळ काढला.

जखमी अवस्थेत अशोकला सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उचारांसाठी नागपूर येथे रेफर करण्यात आले. नागपूर येथील रुग्णालयात अशोकचा मृत्यू झाला. याबाबतची तक्रार अशोकची पत्नी शोभा कांबळे हिने शहर ठाण्यात दिली असून, पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here