सिंदी (रेल्वे) : नगर प्रमुख पाच समस्यांना घेऊन नगराध्यक्षा, सौ.बबीताताई तुमाने, यांचे नेतृत्वात सर्वपक्षीय जनआंदोलन शुक्रवार तारीख 22 ऑक्टोंबरला करण्यात आले, आंदोलनात नगरातील सर्व शाळा/महाविद्यालय/बाजारपेठ बंद करुन ऊडानपुल रेल्वे स्टेशन चौकात धरने आंदोलन करण्यात आले.
संकाळी 11:00 वाजता सुरु झालेले धरने आंदोलन अधिका-यांचे आश्वासनाने दुपारी 03:00 वाजता संपविण्यात आले. आंदोलनात स्थानिक व्यापारी, सर्व पक्षीय कार्यकर्ता पदाधिकारी, नगरसेवक, विद्याथी संघठन व नगर वासीयांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता, संकाळी 10:00 वाजता बॅड पथकासह मार्चा काढुन ऊडानपुलाजवळ आयोजीत सभा मंडपात धरने आंदोलनास 11:00 वाजता सुरुवात झाली.
त्यात प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे ॲङ सुधीरभाऊ कोठारी व माजी आमदार श्री. राजुभाऊ तिंमाडे श्री.किशोरभाऊ दिघे, श्री. आशीषजी देवतळे, श्री. सुधाकर खेडकर,श्री.अशोकबाबु कलोडे, श्री.ओमप्रकाशजी राठी, नगराध्यक्षा,सौ.बबीताताई तुमाने, श्री. संदिप खेडकर, श्री. मुन्नाभाऊ शुक्ला, श्री. गंगाधर कलोडे, श्री. निळकंठराव घवघवे, श्री मनोज पेटकर श्री. राहुलजी कलोडे,रमावतार तूर्कुयाल यांनी सिंदी समन्यानवर प्रकाश टाकला त्यात प्रामुख्याने सिंदी आर.ओ.बी चे रखडलेले काम रेल्वे प्रवासी गाड्याचे थांबे पुर्ववत सुरु करणे, (एन.एच.ए.आय.) चे सेलडोह-सिंदी मार्गाचे दोन वर्षापासुन बंद असलेले बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा मांगली – सिंदी मार्गाची खस्ता हालत आदी समस्याना घेऊन सिंदी (रेल्वे) बंद ठेऊन धरना आंदोलन करण्यात आले .
त्यात प्रामुख्याने युवा वर्गाने मार्चात मोठ्या संख्येने सहभाग घेतला खासदार श्री.रामदासजी तडस, हेसिंदी येथील निर्माणाधीन डोर्यपोर्ट लॉजीस्टीक पार्क निर्माण करण्याकरीता एन.एच.ए.आय. ला हस्तातंरीत समारोहामध्ये असल्यामुळे त्यांनी आंदोलन कर्त्याशी फोनवर चर्चा करुन वरिष्ठ अधिका-याशी चर्चा केली आमदार श्री.समीरभाऊ कुणावार साहेब, हे बाहेरगावी असल्यामुळे त्यांनीही फोनद्यावरे सार्वजनिक बांधकाम विभाग,वर्धा व नॅशनल हॉयवे यांचेशी संपर्क करुन दिनांक 26 ऑक्टोंबरला बैठकीत समस्याचे निराकरण करण्याची माहिती दिली.
आंदोलन कर्त्याशी चर्चा करण्याकरीता एन.एच.ए.आय चे अधिकारी महाजन, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी श्री. देशंपाडे व सार्वजनिक बांधकाम विभाग, वर्धा येथील अभिंयता श्री.भैयसारे यांनी आंदोलन कर्त्याशी चर्चा करुन लवकरात लवकर समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले, रेल्वे प्रशासनच्या वतिने सुरक्षाबल अधिका-यांनी चर्चा करुन वरिष्ठांना आंदोलकाचे मागणीची माहिती पुरविली, आणी लवकरच डि.आर.एन नागपुर यांचेशी शिष्टमंडळाची बैठक करुन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
आंदोलन मंडपास श्री.समीरभाऊ कुणावार यांनी फोनवर चर्चा करुन आपल्या समस्यांना लवकरात लवकर समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले, सभा मंडपात श्री.विलासभाऊ तळवेकर, श्री.सुधाकर वल्के अकिल शेख श्री.अमोल सोनटक्के, श्री.अमोल गवळी, श्री. स्नेहल कलोडे, श्री. अमोल बोंगाडे, श्री. संदिप खेडकर, श्री. राहुल कलोडे श्री निळकंठराव घवघवे श्री. मुन्ना शुक्ला श्री. गंगाधर कलोडे, श्री. अशोकबाबु कलोडे, श्री. रामेश्वरभाऊ घंगारे, श्री.बाबाराव सोनटक्के, श्री. गुल्लभाऊ भंसाली, श्री. नरेंद्रजी सेलूकर श्री अजयभाऊ कुंभारे श्री. प्रकाशभाऊ सिरसे, श्री.सुनिल रेवतकर, श्री.रमेश परखड, श्री.सुनिलभाऊ बोंबले श्री. नानाभाऊ सोनपितळे, श्री. अमोल गवळी श्री. प्रमोदभाऊ शिंद, श्री. जंयतराव बडवाईक, नगरसेवीका सौ.अजया साखळे, सौ.सुमनबाई पाटील, सौ. वंदना सेलुकर सौ. पुष्पाताई सिरसे सौ. वनिताताई मदनकर यादीने धंरने आंदोलनात सहकार्य केले.