वर्धा : क्षुल्लक वादातून वृद्धास दोघांनी मारहाण करीत जखमी केले. गॉडप्लॉट परिसरात ही घटना घडली. रामदास मोतीराम शेंडे रा. दयालनगर हा गॉंडप्लॉट येथे त्याच्या नातेवाईकाकडे गेला होता, दरम्यान, तेथे आतरी महिस्कर आणि सजिश महिस्कर रा. चानकी कोपरा हे आले आणि रेशनकार्ड मागू लागले.
रामदासने त्यांना तहसील कार्यालयात विचारपूस करण्याचा सल्ला दिला असता दोघांनी त्याला लाथाबुक्क्यांनी तसेच काठीने मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी रामदासने शहर पोलिसात तक्रार दाखल केली.