

आर्वी : येथील हनुमान बॉर्डातील शिव बाल उत्सव समितीचे कार्यकर्ते विसर्जन दरम्यान नाचत असताना अज्ञात युवक तेथे नाचत असल्याचे लक्षात येताच त्याला हटकण्यात आले. याच कारणावरून वाद झाला. पण निवळलेल्या वादाचे नंतर हाणामारीत रुपांतरण झाले. यात काही तरुण जखमी झाल्याने या प्रकरणी आठ व्यक्तींविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. याप्रकरणी काऊंटर तक्रारी दाखल करण्यात आल्या आहित.
विकी उर्फ पियूष दिगंबर ‘पाठणकर व अनिकेत सुरेश वहारे अशी तक्रारदारांची नावे आहेत. दोन्ही तक्रारीवरून पोलिसांनी विकी धकाते, शुभम शिरपुरे, बाबू मुजाडे, ऋषभ कठाणे तर अनिकेत वहारे, सचिन बुले, दिनेश होळकर, बाल्या नागोसे सर्व रा. हनुमान वॉर्ड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. देवी विसर्जन दरम्यान महिला नाचत असल्याने काहींना तरुणांना हटकले. याच कारणावरून दोन गटात वाद झाला. काहींनी मध्यस्ती केल्यावर वाद निवळला. पण संतापलेल्या तरुणांनी पुन्हा वाद करून मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेतली असून या प्रकरणाचा पुढील तपास आर्वी पोलीस करीत आहेत.