

वर्धा : घरगुती कारणातून झालेल्या वादात पत्नीच्या डोक्यावर तव्याने मारहाण करीत जखमी केले. गोंडप्लॉट परिसरात ही घटना घडली. जया वाडगुरे ही घरी असताना पती नंदजी उर्फ पांडू हा मद्यधुंद अवस्थेत घरी आला. तो कुणाला तरी फोनवर शिवीगाळ करीत असताना पत्नी जयाने त्यास हटकले. संतापलेल्या नंदजी याने जयाच्या डोक्यावर तव्याने मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.