

अल्लीपूर : नजीकच्या तळेगाव (टा.) गावालगत असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी घडली. गौरव बावणे (२२), असे मृत युवकाचे नाव आहे. गौरव बुडाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत गौरवला पाण्याबाहेर काढले. त्यानंतर त्याला तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणीअंती गौरवला डॉक्टरांनी मृत घोषित केले.