घरातून चोरट्याने २८ हजारांची रोख केली लंपास! पोलिसात तक्रार दाखल

पुलगाव : अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करीत पैसे असलेली पर्स चोरून नेली. दहेगाव धांदे येथे ही घटना घडली. सीमा पाटमासे हिने ‘फायनान्सचे 3० हजार रुपयाच्या कर्जाची उचल केली होती. त्या दिवशी तिने दोन हजार रुपये खर्च करून उर्वरित २८ हजार रुपयाची रोख हॅण्डबेंगमध्ये ठेवून बॅग ड्रममध्ये ठेवली होती.

अज्ञात चोरट्याने ती पैसे असलेली बॅग चोरून नेली.याप्रकरणी पुलगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून पोलिसांनीही याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here