वर्धा : विनयभंग करणाऱ्या आरोपीस दंडासह कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल वर्धा येथील मुख्य न्याय दंडाधिकारी प्रांजली राणे यांनी दिला. योगेश भास्कर धानोरकर रा. वर्धा असे शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव आहे.
पीडिता ही नळावर पाणी भरण्यासाठी गेली असता, आरोपी योगेश धानोरकर याने तेथे येत पीडितेचा विनयभंग केला. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून वर्धा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेतली.
सदर प्रकरण तपासाअंती न्यायप्रविष्ट करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, साक्ष व पुरावे लक्षात घेऊन, न्यायाधीश प्रांजली राणे यांनी आरोपी योगेश धानोरकर याला १ वर्षाचा सश्रम कारावास, तसेच १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस कर्मचारी भाजीपाले यांनी काम पाहिले, तर शासकीय बाजू अँड-सिद्धार्थ उमरे यांनी मांडली.