

वर्धा : येथील आरटीओ कार्यालयातील खासगी वाहन हस्तांतरनाचे काम सांभाळनार्या दोन महिला लिपिकांकडून येथे येणार्या वाहनधारकांना उद्धट वागणूक मिळत असल्याचे दिसून येते असल्याच्या तक्रारी वाहनधारकांकडून होत आहे. या दोन्ही महिला लिपीक आपल्याच तोर्यात वागत असल्याने त्यांच्या मानमानी कारभाराने या विभागात कामाकरीता येणार्या वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या महिला लिपीकांकडे खासगी वाहन हस्तांतरनाचे काम असल्याने मोठ्या प्रमाणात वाहणधारक या विभागात हस्तांतरणाची माहिती विच्यारण्याकरीता व वाहण हस्तांतरणाकरीता येतात मात्र त्यांचे कोणत्याच प्रकारचे समाधान केल्या जात नाही, कामासंबंधी योग्य ती माहिती दिल्या जात नाही त्यांना हाकलून लावण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून केल्या जाते परिणामी वाहनधारकांना दलालांचा सहारा घ्यावा लागतो.
त्यामुळे या कार्यालयात येणार्या वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. काहींनी याबाबतची तक्रार येथील प्रभारी सहायक उपप्रादेशिक परिवन अधिकारी तुशारी बोबडे यांच्याकडे केली होती त्यावेळी या महिलांना बोलवत समज देण्यात आली होती मात्र या महिला लिपीकांच्या वागनुकीत काही बदल झाल्याचे दिसत नसल्याने या दोन्ही महिलांचे या विभागाचे काम काढून घेत त्यांच्याकडे दुसरा विभागाची जबाबदारी सोपविण्यात यावी अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
दलालांकरीता महिलांचे वेगळे नियम…
या महिला लिपीक वाहनधारकांना त्रास देऊन त्यांना दलालांकडे जाण्यास भाग पाडतात एखादी वाहनधारक स्वता हस्तांतरणाकरीता आला तर हा हाताने भरलेला फॉर्म चालत नाही ऑनलाईन फॉर्म भरुन आना ज्याच्या नावे वाहन करीत आहे त्यानेच स्वता उपस्थीत राहुन आमच्याकडे फॉर्म जमा करा अशा अनेक नियम सांगत त्यांना परतून लावल्या जाते मात्र दलालांकडून पैसे घेत सर्वकाही म्यानेज केल्या जाते असाच प्रकार सध्या या विभागात चालू आहे.
वाहनधारकांना ठेवतात तात्कळत…
कार्यालयाची मधली सुटीची वेळ दुपारी १.३० ते २.०० ची आहे या कार्यालयातील सर्व लिपीक याच वेळेत चहा पाणी घेऊन वेळेत आपली कामकाज सुरु करता मात्र या दोन्ही महिला लिपीकांनी आली जेवणाची वेगळी वेळ ठरविली आहे. २ ते ३ असा एक तासाचा वेळ त्या मधली सुटी घेतात त्यामुळे कामाकरीता या विभागात येणार्या वाहनधारकांना एक-एक तास तात्कळत वाट पाहत बसाव लागते ईतक्यावरच त्यांची समस्या सुटत नाही तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत कार्यालयाचे काम चालू असताना या महिलांनी दोन वाजेपर्यंत वाहनधारकांचे काम होईल असे फर्मान सोडले आहे. त्यामुळे २ वाजेनंतर आलेल्या वाहनधारकांना परत पाठविल्या जाते. या मनमानी कारभारामुळे वाहनधारकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.