

वर्धा : भरधाव ट्रकने कारला कट मारल्याने कार उलटून कारमधील व्यक्ती जखमी झाले. तसेच कारचे नुकसान केले. हा अपघात निमगाव फाटा ते कृष्ण मंदिर रस्त्यावर झाला.
समीर शेख शकील शेख हा त्याच्या काकाच्या कारने वर्ध्याकडे येत होता. कार मोहित डेकाटे चालवीत होता. दरम्यान, भरधाव आलेल्या अज्ञात ट्रकने कारला कट मारल्याने कार अचानक रस्त्याकडेला उलटली. यात समीर शेख शकील शेख आणि मोहित डेकाटे हे जखमी झाले. याप्रकरणी सावंगी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या रस्त्यावर रात्रीच्या सुमारास काळोख राहत असून कुठेही पथदिवे सुरु राहत नसल्याने दररोज अपघात घडत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन तत्काळ या मार्गावर पथदिवे बसविण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. असे केल्यास अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.