मातंग समाजाची मागणी! वाजंत्री कलाकारांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा; तहसीलदारांना दिले निवेदन

देवळी : मसकऱ्या गणपतीच्या विसर्जनानिमित्त वाजंत्रीचे काम करणाऱ्या मातंग समाजाच्या कलाकारांना सावंगी ठाण्यातील पोलिसांनी मारहाण केली. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना जबाबदार न धरता बँड कलाकारांवर केलेली. कारवाई बेजबाबदारपणाची तसेच दलित समाजावर अन्याय करणारी असल्याने दोषींवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी मातंग समाजाच्या वतीने तहसीलदार राजेश सरवदे यांना निवेदनातून केली.

सालोड हिरापूर येथे देवळी येथील वाजंत्री मंडळी गणेश विसर्जनानिमित्त गेली. होती. गणेशाची मूर्ती विसर्जनासाठी गेल्यानंतर वाजंत्री मंडळी लोकांचे आग्रहास्तव थांबून काही गाणे वाजवत होती. दरम्यान, सावंगी पोलिसांनी येत. वाजंत्रींना मारहाण केली. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून कलाकारांना व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. अतिशय वाईट परिस्थितीत व अर्धपोटी उपाशी राहून त्यांनी या काळात वास्तव्य केले.

असे असताना संबंधित गणेश मंडळाला जबाबदार न धरता कलाकारांना झालेली मारहाण अन्यायकारक ठरली आहे. त्यामुळे दोषी पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लहूशक्तीचे शहराध्यक्ष विनोद शिखरे, उपाध्यक्ष रमेश पवार, सचिव आकाश बावणे व मातंग समाजातील कलाकारांनी निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here