चंद्रपूर, दि. 13 जुलै:जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर कार्यालयाचा माध्यमातून दिनांक 15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून जिल्हास्तरावर साजरा करण्यात येत असतो. परंतु या वर्षी कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे जागतिक युवा कौशल्य दिन ऑनलाईन पद्धतीने दिनांक 15 जुलै रोजी साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार असणार आहेत. दि.15 जुलै ते 17 जुलै पर्यत युवक,युवतींना ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परिक्षा व करिअर संबंधी मागर्दर्शन व रोजगाराच्या संधी याबाबत देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष एमआयडीसी असोसिएशन चंद्रपूरचे मधुसूदन रुंगठा, कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तथा जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण सुशील बुजाडे हे करणार आहेत.
या दिवशी इच्छूक युवक,युवतींना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर कार्यालयाची chandrapurrojgar@gmail.com. या ई-मेल वर स्वतःची व्यक्तिगत माहिती (जी-मेल आयडी, मोबाईल नं.) पाठविण्यात यावे व https://meet.google.com/vmy-skca-aox या लिंकवर दिनांक 15 जुलै रोजीचे ऑनलाईन कार्यक्रमात जेणेकरुन सहभागी होता येईल. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,चंद्रपूर या कार्यालयाच्या दुरध्वनी क्र.07172-252295 या क्रमांकावर संपर्क साधावे, असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भैय्याजी येरमे यांनी केलेले आहे.