बीए-बीवायएसटी अंतर्गत मेंटर ऍडव्हायझरी पॅनल वर सुरेश गणराज यांची सदस्य नियुक्ती

वर्धा : बजाज ऑटो भारतीय युवा शक्ती ट्रस्टच्या माध्यमातून बनविण्यात येणाऱ्या भावी उद्योजकांना व्यवसाय करण्याकरिता बँकेमार्फत पुरविण्यात येणारे कर्ज सहजरित्या उपलब्ध व्हावे या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्यात येतो. अशा भावी उद्योजक होऊ उमेदवारांना बीए-बीवायऐसटि मार्फत उद्योजकीय धडे देण्यात येत असतात. त्या माध्यमातून बीए-बीवायऐसटि यशस्वी उद्योजक निर्माण करण्याचे कार्य करीत आहे. अशा युवा वर्गांना उद्योजकीय धडे देण्याचे कार्य येथील प्रसिद्ध अभीप्रेरक वक्ता तसेच बीए-बिवायएसटीचे मेंटर सुरेश गणराज सातत्याने करीत असतात.

या कार्याचे महत्त्व ओळखून बीए-बीवायएसटी यांनी मेंटर ऍडव्हायझरी पॅनल वर 2021 -22 करिता सुरेश गणराज यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. सुरेश गणराज यांना मेंटर ऍडव्हायझरी पॅनलचे सदस्य प्रमाणपत्र डॉक्टर सोहम पंड्या ऍडव्हायझरी पॅनलचे अध्यक्ष यांचे हस्ते मातोश्री सभागृह येथे आयोजित केलेल्या स्टॅटरेजिक समिती मध्ये देण्यात आले. यावेळी मंचावर बीए-बीवायएसटीचे मेंटर ऍडव्हायझरी पॅनल चे अध्यक्ष डॉक्टर सोहम पंड्या, वर्धा चाप्टर अध्यक्ष सुधीरभाऊ पांगुळ तसेच स्ट्रॅटेजिक समितीचे उपाध्यक्ष मुस्तफा शौक विराजमान होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच भूमिका प्राध्यापक विलास बैले, इआयजी समितीचे अध्यक्ष यांनी केले. तसेच संचालन निखिलेश थुल, सीनियर फिल्ड ऑफिसर, बीए-बीवायएसटी यांनी केले. तर उपस्थितांचे आभार वर्धा चाप्टर चे अध्यक्ष सुधीरभाऊ पांगुळ यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता अनांजी सोरटे, वित्त अधिकारी, बीए-बीवायएसटी निखिलेश थुल, संदेश राऊत तसेच बीए-बीवायएसटीच्या इतर सहकार्यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here