विहिरीत उडी घेत दोघांनी संपविले जीवन! हिंदनगर, पिपरी बेड्यावरील घटना

वर्धा : आजारपणाने त्रस्त झालेल्या व्यक्‍तीने तसेच मनोरुग्ण वृद्धाने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. वडनेर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पिपरी पारधी बेडा परिसरात, तर रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंदनगर परिसरात ही घटना उघडकीस आली.

हिंदनगर येथील ठिजय शंकर नक्षणे याला अपंगत्व आल्याने त्यांचा उजवा हात व उजवा पाय निकामी झाला होता. त्यांना चालता-फिरता येत नसल्याने त्यांनी आजारपणाला कंटाळून विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. याची नोंद रामनगर पोलिसांनी केली आहे. दुसऱ्या घटनेत पिपरी पारधी येथील निर्वाशा चंपत चव्हाण (रा. कुटकी) यांच्या पत्नीचा तीन वर्षापुर्वी मृत्यू झाल्याने त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्यांना त्यांच्या जावयाने पारधी बेडा येथे नेले असता त्यांनी विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.

याप्रकरणी वडनेर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. दिवसेंदिवस आत्महत्यांच्या घटना वाढत असल्याने ही चिंतेची बाव आहे. अनेकांनी मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचेही दिसून आले हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here