
वर्धा : चोरट्याने कुलूपबंद घरात प्रवेश करून ५१ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना मास्टर कॉलनी परिसरात उघडकीस आली.
अशोक हातगरे हे किरणा दुकान चालवितात. अशोक व त्यांची पत्नी दोघेही किराणा दुकानात असताना रात्रीच्या सुमारास चोरट्याने त्यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत कपाटात ठेवलेली सोन्याची पोत, सोन्याचे डोरले, कानातील बिऱ्या, सोन्याची रिंग, सोन्याचे खडे, चांदीचे कडे, आणि १० हजार रुपये रोख असा एकूण ५१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
अशोक घरी आले असता त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्यांनी तत्काळ याची माहिती शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. असून चोरट्याचा शोध पोलीस घेत आहेत.