समुद्रपूर : नागपूर-चंद्रपूर महामार्गावर भरधाव निष्काळजीपणे दुचाकी चालवित असताना नियंत्रण सुटून समोरुन येणाऱ्या ट्रकवर आदळली. या अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून दोघे गंभीर जखमी आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी बरबडी शिवारात घडला.
साहिल पांडुरंग बालपांडे (१६) रा. संत तुकडोजी वॉर्ड असे मृत युवकाचे नाव असून चिकू घाटे व यश तेलतुमडे गंभीर जखमी झाले. चिकू घाटे (२०) याच्या एम.एच. ३१ ई. स.७४१७ क्रमांकाच्या दुचाकीने हे तिघेही नागपूरकडून चंद्रपूरकडे जाणाऱ्या मार्गावरुन झिकझॅक जात होते. चालक चिकूचे दुचाकीवरील यंत्रण सुटल्याने दुचाकी समोरुन येणाऱ्या एम.एच.४० ए.के, ३१३७ क्रमांकाच्या ट्रकवर आदळली. यात साहिलचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. महामार्ग पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले.