महिलांना दिलासा! सुरक्षेकरिता राज्य परिवहन महामंडळाने उचलेले पाऊल; महिलांकरिता रात्रीच्या प्रवासाला एसटीची सुरक्षा: बसमधील दिवे आता सुरूच राहणार

आर्वी : रात्रीच्या वेळी अनेक महिला एकट्यादुकट्या प्रवास करतात. प्रवास करताना त्यांच्या मनात विविध दडपण आणि अनाहूत भीती असते. त्यांना कधी काळी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. अशा अनेक महिलांना दिलासा मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) रात्री प्रवास करणाऱ्या महिलांना समाजकंटकांच्या त्रासापासून वाचवण्यासाठी बसमधील दिवे बंद न करण्याच्या सूचना एसटीच्या चालक-वाहकांना दिल्या आहेत.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी एसटीने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयासंदर्भात विभाग नियंत्रक कार्यालयाला हे निर्देश देण्यात आले आहे. अनेक महिला साध्या बस, निमआराम, स्वमालकीच्या व भाडेतत्त्वावरील शिवशाही, शिवनेरी, अश्वमेघ या बसमधून प्रवास करतात. आता या निर्णयामुळे महिलांमध्ये काही प्रमाणात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

वर्धा जिल्ह्यात आर्वी, हिंगणघाट, तळेगाव, पुलगाव व वर्धा असे पाच आगार आहेत. या आगारात एकूण २१३ बसेस धावत आहेत. अनेक बसेस लांब पल्ल्याच्या असतात. त्यात अनेक महिलाही प्रवास करतात त्यामुळे हा आदेश सर्व विभाग नियंत्रक कार्यालयाकडून चालक-वाहकांपर्यंत पोहोचवून आदेशाची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here