

देवळी : वडिलांना शिवीगाळ करण्यास हटकले असता, तिघांनी युवकासह त्याच्या आतेभावाला हॉकीने, तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत गळ्यातील दोन सोन्याच्या चेन हिसकावून पळ काढला. ही घटना औद्योगिक वसाहत परिसरात घडली.
सूरज घोडे आणि त्याचा आतेभाऊ हे दोघे औद्योगिक वसाहतीत असलेल्या ढाब्या गेले होते. दरम्यान, तेथे राजू तेलकट, किशोर रामगडे, कुणाल तायवाडे हे होते. त्यांनी सूरज आणि त्याच्या वडिलांना शिवीगाळ सुरू केली. शिवीगाळ का करता, असे म्हटले असता, तिघांनी सूरजला हॉकीने जबर मारहाण केली. आतेभाऊ भूषण हा वाद सोडविण्यास गेला असता, त्यालाही मारहाण करण्यात आली, तसेच भूषणच्या गळ्यातील दोन चेन हिसकावून तेथून पळ काढला. या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.