पवनार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याच्या बाजूला होणारा पेट्रोल पंप रद्द करावा, जिल्हाधिकारी महोदयांची बदली करावी यासह अनेक मागण्यासाठी विल्सन मोखाडे गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करीत आहे. परंतु प्रशासन दाद देत नसल्याने त्यांनी धाम नदी पात्रात आज सोमवार ला जलसमाधी घेणार असल्याची धमकी प्रशासनाला दिली होती.
त्यामुळे पोलीस प्रशासन कालपासून मोखाडे यांच्या मार्गावर होते धाम नदी परिसरात सकाळपासून मोठा पोलीस ताफा तैनात होता बारा वाजताच्या सुमारास मोखडे हे आंबेडकर पुतळ्यापासून रवाना झाल्याची गुप्त वार्ता पोलीस प्रशासनाला मिळाल्याबरोबर पोलीस अलर्ट मोड वर आले व पवनार लागत राष्ट्रीय महामार्गावर सेवाग्राम पोलिसांनी त्यांना घेरून स्थानबद्ध केले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चांगलीच दक्षता बाळगली सेवाग्रामचे ठाणेदार निलेश ब्राह्मणे यांचे मार्गदर्शनात जमादार संजय लोहकरे, अयुब खान, श्री लसुंद्रे, सुधीर रडके व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर मोहीम पर पाडली. पुढील कार्यवाहीसाठी मोखडें यांना सेवाग्राम पोलिस स्टेशनला नेण्यात आले त्यांचे समवेत विशाल नगराळे व सहकारी होते.