एकात्‍म आणि वैविध्‍य भारतीय संस्‍कृतीचा मूळ आधार होय! आरिफ मोहम्‍मद खान

वर्धा : एकात्‍म आणि वैविध्‍य भारतीय संस्‍कृतीचा मूळ आधार होय असे विचार केरळचे राज्‍यपाल श्री आरिफ मोहम्‍मद खान यांनी व्‍यक्‍त केले. श्री खान आज पंडित दीनदयाल उपाध्‍याय यांच्‍या जयंतीनिमित्‍त महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालय, वर्धा येथे को ‘एकात्‍म मानववादाची सभ्‍यता दृष्टी: वैश्विक साम्‍प्रदायिकतेचा एकमेव पर्याय’ या विषयावर आयोजित ऑनलाइन आणि ऑफलाइन कार्यक्रमात विशेष व्‍याख्‍यान देत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विश्‍वविद्यालयाचे कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल होते.

राज्‍यपाल श्री आरिफ मोहम्‍मद खान म्‍हणाले की एकात्‍म मानववाद आमच्‍या संस्‍कृतीचा पाया असून आम्‍ही आत्‍म्याच्‍या माध्‍यमातून एकमेकांशी जोडले गेलो आहोत. भारताने विविधतेचा केवळ स्‍वीकारच केला नसून सम्‍मानही केला आहे. मानव प्रेम आमच्‍या चेतनेचा आधार आहे. आमच्‍या सर्व ग्रंथांचा सार परोपकार आहे. पंडित दीनदयाल उपाध्‍याय यांना उद्धृत करतांना ते म्‍हणाले की धर्म मंदिर आणि मस्जिदी पर्यंतच सीमित नाहीत.

मंदिर, मस्जिद पंथ निर्माण करतात, धर्म नव्‍हे. धर्माचा परिघ व्‍यापक आहे. अफगानिस्‍तानच्‍या घटनांचा संदर्भ घेत राज्‍यपाल म्‍हणाले की आतंकवाद, महिलांवरील अत्‍याचाराचा मानस ठेवणारे संपूर्ण जगासाठी धोका निर्माण करतात. कोविड काळात आतंकवादजनित असुरक्षा आणि शांतता व्‍यवस्‍था यांच्‍या अभावामुळे जवळपास शंभर देशांमध्‍ये कोरोना प्रतिबंधक व्‍हैक्सिन देण्‍यात समस्‍या आल्‍यात असेही ते म्‍हणाले.

अध्‍यक्ष म्‍हणून बोलतांना विश्‍वविद्यालयाचे कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल म्‍हणाले की संपूर्ण विश्‍व सभ्‍यता एका नव्‍या प्रकारच्‍या धोक्‍याचा सामना करत आहे. उपासना पंथाच्‍या माध्‍यमातून लोकांचे विभाजन करण्‍याची उठाठेव चालली आहे. उपासना पंथांमध्‍ये जेही श्रेष्‍ठ आहे त्‍याला जीवनाचा भाग मानून संपूर्ण जगात शांतता कायम केली जाऊ शकते. भारताची दृष्टी मूळात समग्रतेत विचार करणारी आहे. एकात्‍म मानववादाचा विचार मनुष्‍याला समग्रतेत बघतो. एकात्‍म मानववादाची ही दृष्टी संपूर्ण जगाकरिता कल्‍याणकारी आहे असेही ते म्‍हणाले.

कार्यक्रमाचा प्रारंभ संस्‍कृत विभागाचे सहायक आचार्य डॉ. जगदीश नारायण तिवारी यांच्‍या मंगलाचरणाने झाला. प्रकुलगुरु प्रो. हनुमानप्रसाद शुक्‍ल यांनी स्‍वागत भाषण दिले. प्रकुलगुरु डॉ. चंद्रकांत रागीट यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन कुलसचिव क़ादर नवाज़ ख़ान यांनी केले. तुलसी भवनातील गालिब सभागृहात आयोजित या ऑफलाइन आणि ऑनलाइन कार्यक्रमात विश्‍वविद्यालयातील शिक्षक, अधिकारी आणि विद्यार्थ्‍यांनी मोठया संख्‍येने भाग घेतला. कार्यक्रमाचे सजीव प्रसारण गूगल मीट, यूट्यूब, फेसबुक आणि ट्विटरवर करण्‍यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here