वर्धा : ध्वनी प्रदुषण नियंत्रणासाठी तालुकास्तरावर समिती स्थापित करण्यात आली असून समिती व्दारे जिल्हयातील ध्वनीप्रदुषण नियंत्रण करण्यात येणार आहे. ध्वनीप्रदुषण आढळल्यास दोषीवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी समितीला दिले आहे.
या समितीमध्ये अध्यक्ष म्हणुन तहसिलदार काम पाहणार असून सदस्य सचिव मुख्याधिकारी, संबंधित पोलिस स्टेशनचे अधिकारी, गटविकास अधिकारी सदस्य असणार. मंडप, पेंडॉल तपासणी पथकामध्ये पोलिस विभागाचे वर्धा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सत्यविर बंडीवार भ्रमणध्वनी 9823143528, सेवाग्राम पोलिस स्टेशन- निलेश ब्राम्हणे 9404849461, सावंगी पोलिस स्टेशन बाबासाहेब थोरात 8779070295, रामनगर पोलिस स्टेशन – श्री. चांदेकर 9518557381, वर्धा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दिपक चौधरी 7218069286, नगर परिषदेचे सहायक अभियंता अभिषेक गोतकर 9096502302, संदिप डोईजळ 9028824723, तहसिल कार्यालयाचे पुरवठा निरिक्षक महेश थेरे 9096888649 यांची नियुक्ती करण्यात आली असून नागरिकांनी ध्वनीप्रदुषणा बाबत समितीच्या सदस्याच्या भ्रमणध्वनीवर तक्रार करावी.
समिती मार्फत ध्वनी प्रदुषणाबाबत शासनाने ठरवून दिलेल्या आवाजाच्या पातळी पेक्षा जास्त पातळी वाढविली असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा जनतेकडून तक्रार प्रापत झाल्यास त्यावर पथकाने तपासणी करुन नियमानुसार कारवाई करावी. आपल्या कार्यक्षेत्रात सण उत्सव काळात उभारण्यात येणा-या तात्पुरत्या मंडपास परवाणगी दिल्यानंतर प्रत्येक मंडपाला क्रमांक देण्यात यावा. त्यांची नोंद सबंधित नोंदवहीत घेण्यात यावी. परंतु विना परवाणगी तात्पूरता मंडप उभा केल्याचे निदर्शनास आले किंवा जनतेकडून तशी तक्रार प्राप्त झाल्यास सदर पथकाने तपासणी करुन विनापरवाणगीने उभारण्यात आलेल्या मंडप आयोजकावर कारवाई करावी. दोन चाकी, चारचाकी सहा चाकी वाहने व इतर मार्गाने होणा-या वायु प्रदुषणाबाबत आपल्या स्तरावरुन कार्यवाही करावी तसेच झाडे लावुन त्याची जोपासणा करण्याकरीता जनतेमध्ये जनजागृती समिती मार्फत करण्यात येणार आहे.