घरातून मोबाईल अन्‌ रोख पळविली! आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा : उसने पैसे दिले नाही, म्हणून मोबाइल व नगदी रोख घेऊन पळून गेला. अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाथरी येथे ही घटना रोजी घडली.

अनिकेत बाळासाहेब कोहळे रा.पाथरी याने दीपक साहेबराव गावंडे याच्याकडून १२ हजार रुपये उसने घेतले होते. १९ सप्टेंबर रोजी गावंडे हा गाडी क्र. एम.एच. ३२ सी. ४३४५ ने कोहळे यांच्या घरासमोर आला व उसने घेतलेले १२ हजार रुपये आत्ताच्या आत्ता दे, असे म्हणत वाद केला. त्यावर अनिकेत कोहळे याने पैसे नाही, असे म्हटल्यावरून आरोपीने घरातील मोबाइल व रोख असा एकूण ९ हजार रुपयांचा मुद्देमेल लंपास केला.

कुणाला काही सांगितले, तर हातपाय तोडून टाकीन, अशी धमकी दिली. या प्रकरणी अनिकेत कोहळे यांच्या तक्रारीवरून अल्लीपूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here