

वर्धा : शहरातील भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वरुण पाठक यांच्या नेतृत्वात आज 20 सप्टेंबर रोजी विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा कोरोना निर्बंध व नदीपत्रात होणाऱ्या प्रदूषणाला आळा बसावा या अनुषंगाने पर्यावरण पुरक गणेश विसर्जन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून भाजपा सरचिटणीस व नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या हस्ते विसर्जन रथाचे पूजन करून रथ रवाना करण्यात आला. सकाळी 10 ते सायंकाळी 8 पर्यंत शहरातील घरोघरी जाऊन बाप्पाचे विसर्जन थाटामाटात करण्यात आले.
पर्यावरण पूरक गणेश विसर्जन आपल्या दारी या संकल्पनेला नागरिकांचा दरवर्षीप्रमाणे उत्तम प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी गणेश मूर्तीचे विसर्जन नदी, विहीर यामध्ये न करता आमच्या विसर्जन रथातील कुंडात करून पर्यावरण समतोल साधण्यात सहकार्य केल्याबद्दल भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वरून पाठक यांनी नागरिकांचे आभार मानले.
यावेळी भाजयुमो चे वैभव तिजारे, प्रसाद फटिंग, प्रिया ओझा, श्रुष्टि दंढारे, बादल झामरे, शुभम खंडारे, शुभम दुबे, रुपेश महाजन, सुमित दूरतकर, आकाश घोडमारे, भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.