भरदिवसा घरफोडी! दागिन्यांवर डल्ला; ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी

वर्धा : अज्ञात चोरट्याने दाराचे कुलूप तोडून खोलीत ठेवून असलेले दागिने व रोख रक्कमेवर डल्ला मारुन चोरून नेले. ही घटना भुगाव येथे १४ रोजी दुपारच्या सुमारास घडली.

मीरा वसंत टेंभरे ही हिंगणघाट येथे बहिणीकडे गेली होती. दुपारी चोरट्याने टेंभरे यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून धान्याच्या कोठीत ठेवलेली सोन्याची पोत, बिऱ्या, सोन्याची अंगठी, चांदीच्या तोरड्या, चांदीचे जोडवे आणि २० हजार रुपये रोख असा एकूण ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करून ठसे तज्ज्ञाला पाचारण केले होते. पुढील तपास सावंगी पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here