
हिंगणघाट : तुझ्या पक्षाचा माणूस गावात रोड का बनवत नाही या क्षुल्लक कारणावरून वाद घालत ‘एकाने दुसऱ्या व्यक्तीच्या तोंडावर वीट मारून जखमी केले. तालुक्यातील शेगाव कुंड येथे रविवारी सकाळी ही घटना घडली.
शेगाव (कुंड) येथील नामदेव वंजारी आपल्या शेळ्या चारण्याकरिता ग्रामपंचायतीजवळून जात असताना कवडुकुमरे याने त्याला आवाज देत जवळ बोलावले व तुझ्या पक्षाचा माणूस गावात रोड का बनवत नाही असे म्हटले. वंजारी यांनी सध्या पावसाळा असल्याने रस्त्याचे बांधकाम शक्य नाही, असे म्हणून शेळ्या चारण्यास निघाला असता कवडू लक्ष्मण कुमरे याने हातात वीट उचलून तोंडावर म्रारली. यात नामदेव वंजारी जखमी झाला. तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसांनी घटनेची नोंद घेतली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.