

वर्धा : खर्रा घेण्यासाठी पानटपरीवर गेलेल्या युवकावर जुन्या वादातून चाकूने मारहाण करीत जखमी करण्यात आले. ही घटना आनंदनगर परिसरात घडली. अतीत सतीश वासे हा रोज मजुरीचे काम करतो. काम नसल्याने तो रात्री जेवण करुन खर्रा घेण्यासाठी पानटपरीवर गेला असता तेथे असलेल्या नयन राजू निंबाळकर याने जुन्या वादातून शिवीगाळ करीत अतीतच्या गळ्यावर आणि पोटावर चाकूने वार करीत त्यास जखमी केले. गळ्याला चाकूने चिरल्याने त्याला सहा टाके पडले. नयन निंबाळकर हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याने अनेकांना मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. जखमीवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरु आहे.