खरांगणा मोरांगणा : संततधार पावसामुळे घराची भिंत पडल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार (ता. ९) दहेगाव गोंडी येथे पहाटेच्या सुमारास घडली रामकृष्ण चौधरी वय (४५ वर्षे) जोती चौधरी (वय ३५ वर्षे) असे मृत पति पत्नीचे नाव आहे. या घटनेत मुलगा आदित्य गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.
रोजच्याप्रमाने चौधरी कुटूंब हे रात्री झोपी गेली होते सततच्या पावसाने त्यांच्या घराची मातीची भिंत खचून पुर्ण घर मध्यरात्री अच्यानक झोपेत असलेल्या चौधरी कुटींबीयांच्या अंगावर कोसळले यात जोती चौधरी मातीच्या मलब्यात दबल्या गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर पती रामकृष्ण चौधरी व मुलगा आदित्य चौधरी याला सामान्य रुग्णालय वर्धा येथे नेतांना पती रामकृष्ण चौधरी यांचा वाटेतच मृत्यू झाला व मुलगा आदित्य याला जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती सुद्धा चिंताजनकच असल्याची माहिती आहे.
परिसरातील नागरीकांनी शर्थीचे प्रयत्न करुन मातीच्या ढिगार्यात दबलेल्या चौधरी कुटूंबीयांना बाहर काढण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होवुन घटनेचा पंचनामा केला. ॲम्बुलन्सची व्यवस्था करून मृतदेह छवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आले. पती-पत्नीच्या अपघाती मृत्यूने पूर्ण दहेगाव गोंडी या गावात शोककळा पसरली असून परिसरात घटनेने हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
वेळीच मिळाली नाही मदत…
सततच्या मुसळधार पावसाने चौधरी यांचे कुडाचे घर पहाटेच्या सुमारास जमीनदोस्त झाले. यात घरात झोपुन असलेले तीनही व्यक्ती मातीच्या ढीगार्यात दबल्या गेले सततच्या पावसाने कुणीही बाहेर निघाले नसल्याने घटणेची माहिती वेळेत परिसरातील नागरीकांना मिळाली नसल्याने काही काळ हे कुटूंब मातीच्या ढिगार्यात दबुन राहल्याने जोतीचा जागीच तर पती रामकृष्ण यांना रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.