

पुलगाव : तु गाव का ‘भाई’ हो गया क्या, असे म्हणत युवकास दगडाने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जखमी केले. नाचणगाव नाका चौकाजवळ ही घटना घडली.
परिसरात हळदीचा कार्यक्रम असल्याने यश धमेंद्र टॅभुर्णे हा बाजार चौकात मित्रांसोबत गप्पा करीत बसला असताना पवन कात्रे, सोनू उर्फ प्रतीक बोरकर, राहूल गावंडे यांनी यशला तु आंबेडकर वॉर्ड का भाई बन गया क्या, असे म्हणून शिवीगाळ करीत वाद केला. तसेच लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण करीत यशला जखमी केले. याप्रकरणी पुलगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करीत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.