हिंगणघाट शहरात पोलिसावर गोळीबार! आरोपी फरार; गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ

दशरथ ढोकपांडे

हिंगणघाट : शहरातील नंदोरी चौकात पोलिस जमादार कमलाकर धोटे यांच्यावर अज्ञात इसमाने गोळीबार केल्याची घटना बुधवार (ता. ११) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. यात अज्ञात इसमाचा हात पकडल्याने गोळी हवेत फायर झाली. गोळीबार करणारे अज्ञात आरोपी दुचाकीवरून पळून जाण्यात यशस्वी झाले असून हिंगणघाट पोलिसात अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

रात्री अकराच्या सुमारास नंदोरी चौकामध्ये दोन इसम दुचाकीने थांबले व त्यांनी चौकात आल्यावर उभे असलेले माजी नगरसेवक अनिल भोंगाडे यांना वरोरा कुठून जाते अशी विचारणा केली. अनिल भोंगाडे यांनी त्यांना तुम्ही कुठून आले व तुमच्या गाडीला नंबर प्लेट नाही असे विचारले असता ते उडवाउडविचे उत्तरे देत होती.

दरम्यान हिंगणघाट पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलिस जमादार कमलाकर धोटे हे साध्या कपड्यांवर आले व अनिल भोंगाडे जवळ थांबले असता त्यांना यातील ऐकाणे या रोडवर पोलिस असते का चेकिंग असते का असे विचारले. जमादार यांना दोघांवर शंका आली त्यांनी लगेच आपला मोबाईल नंबर त्यांना दिला व मला एक मिस कॉल द्या समोरं अडचण आली तर मी त्यांच्याशी बोलील मी देखील पोलिस आहे असे सांगितले.

आरोपींचा मोबाईल नंबर मिळविला या दरम्यान अनिल भोंगाडे लघुशंका करण्यास गेले व जमादार धोटे यांनी तुमच्या बॅगेत काय आहे अशी विचारणा केली. बॅगला हात लावण्याचा प्रयत्न केला असतां अचानक यातील एकाने आपली रिव्हॉल्वर काढून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला मात्र जमादार धोटे यांनी त्याचा हात धरल्याने ती गोळी हवेत फायर झाली व एक काडतूस खाली पडली.

यादरम्यान धोटे ओरडल्याने अनिल भोंगाडे धावत आले व जवळ पडली असलेली विट त्या दोघांना फेकून मारली. या दरम्याने एकाने भोंगाडे यांच्यावर शस्ताने वार करण्याचा प्रयत्न केला मात्र भोंगाडे यांनी परत विट हाती पकडली असल्यानं ते दुचाकीवरून पळून गेले. गुन्हा नोंद करून आरोपीचा शोध घेत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here