वर्धा : दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल साईन्सेस डीम्ड यूनिव्हरसिटीद्वारा जारी केलेले जनरल मेडीसिनची बनावट पदव्यूत्तर पदवी प्रमाणपत्र तयार करुन व्यक्तीगत वापर केल्याप्रकरणी सावंगी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
गोविंद भागीरथ राठोड रा. समतानगर जळगाव याने एडी जनरल मेडीसीन ही पदव्यूत्तर पदवी दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल साईन्सेस डीम्ड युनिव्हरसिटी द्वारे जारी केल्यासारखे बनावट पदवी प्रमाणपत्र तयार करुन याचा वैयक्तीक फायद्यासाठी वापर केला आहे. हा प्रकार उघडकीस येताच सहाय्यक कूलसचिव मनिष पुरुषोत्तम देशमुख यांनी याबाबतची लेखी तक्रार सावंगी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गोविंद राठोड विरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.