लग्नाचे आमिष देऊन युवतीवर अत्याचार

हिंगणघाट : लग्नाचे आमिष देऊन युवतीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना नांदगाव येथे घडली. पीडित युवतीचा विवाह राहुल बैजनाथ पाटील याच्याशी ठरला. त्यामुळे दोघांत बोलचाल सुरू झाली. दरम्यान आरोपीनी पीडितेसोबत त्याच्याच घरी अत्याचार केला.

पीडिता पोलिसात तक्रार देण्यास जात असताना राहुल पीडितेला घरी घेऊन गेला. तेव्हा घरच्यांनी दोघांचेही लग्न तीन महिन्यात करून देतो, असे आश्वासन दिले. पीडितेने लग्नास गळ घातल्यावर आरोपीने नकार दिल्याने पीडितेने पोलिसात धाव घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here