वर्धा : जिल्हा रुग्णालय येथे डेंगू तपासणी किट्सचा तुटवडा आठ दिवसापासून होता. अनेक रुग्णांना डेंगू तपासणी करिता रुग्णालयात गेल्यावर किट्स नाही असे सांगण्यात आले, त्यामुळे प्रायव्हेट पॅथॉलॉजी मध्ये जाऊन रुग्णांना तपासणी करिता 425 रुपयाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे, काहींना सेवाग्राम, सावंगी रुग्णालयाच्या चकरा माराव्या लागतात. त्यामुळे नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
जाणीवपूर्वक किट्सचा तुटवडा दाखवून प्रायव्हेट पॅथॉलॉजी मध्ये रुग्ण जावे याकरिता काही कर्मचाऱ्यांचे रॅकेट काम करीत आहे असा आक्षेप जिल्हा अध्यक्ष मोहन राईकवार यांनी घेतला व तात्काळ अश्या कर्मचाऱ्यांची चौकशी करावी व जनतेला मुबलक किट्स उपलब्ध करून द्याव्या. अशी मागणी बहुजन समाज पार्टी वर्धा जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तडस यांच्या सोबत चर्चा करून करण्यात आली.
सोबतचं ग्रामीण भागात फवारणी व घरोघरी जाऊन सर्वे करण्यात यावा जेणेकरून साथरोग पसरणार नाही व जनतेचे आरोग्य सुधृढ राखण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रनेणे जाणीवपूर्वक प्रयत्न करावा अशी मागणी केली. तात्काळ जिल्हा शल्यचिकित्सक यांनी संबधित अधिकाऱ्यांना फोन करून किट्स बद्दल विचारणा केली व दोन दिवसात मुबलक किट्स उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी मोहन राईकवार जिल्हा अध्यक्ष, अनोमदर्शी भैसारे जिल्हामहासचिव, दिनेश वाणी संघटनमंत्री, दिपक भगत जिल्हा सचिव, मनीष फुसाटे जि. प. सदस्य, सुरेश दुधे, कपिल चंदनखेडे, राज खेड कर उपस्थित होते.