नियमित कर्जफेड करणारे शेतकरी माफीपासून वंचित

तळेगाव : राज्य शासनाच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत थकीत कर्जदारांना दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी देण्यात आली आहे, तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून ५० हजार रुपये देण्याची घोषणा शासनाने केली होती. थकीत कर्जदारांना लाभ मिळाला. मात्र, नियमित कर्जफेड करणारे शेतकरी शासनाच्या प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहिले आहेत.

जिल्ह्यातील दोन लाखांपर्यंत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली; परंतु नियमित कर्जदारांचे प्रोत्साहन अनुदान दोन वर्षे लोटले तरी अद्याप मिळाले नाही. त्यामुळे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांत नाराजी आहे. कर्ज परतफेड करून चुकलो की काय, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. गेल्या वर्षी ३० जूनपर्यंत पीककर्ज भरण्याची अट होती. अनुदान मिळेल या आशेने शेतकरी बांधवांनी पैसे नसतानाही उसनवारी, सोने गहाण ठेवून कर्जाची परतफेड केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here