नुकसानीच्या पूर्वसूचना ७२ तासांत विमा कंपन्यांना द्या! असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी केले

वर्धा : पीक नुकसानभरपाई मिळण्यासाठी शेतक-यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना शेत पिकांचे नुकसान झाल्यापासून ७२ तासांत विमा कंपन्यांना द्याव्यात, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी केले आहे.

योजनेत सहभागी झालेल्या शेतक-यांना नैसर्गिक आपत्ती यामध्ये गारपीट, भूस्खलन, विमा सरंक्षित क्षेत्र जलमय, झाल्यास ढगफुटी, वीज कोसळल्यामुळे, नैसर्गिक आग या स्थानिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा सरेक्षण देण्यात येते. स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखिम विमा सरंक्षण घेतलेल्या शेतक-यांनी सर्वे नंबरनुसार बाधित पिक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासुन ७२ तासांच्या आत क्रॉप इंश्यूरन्स अँप, सबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक, बँक, कृषी व महसूल विभागास लेखी स्वरुपात कळवावे. नुकसान कळवितांना तपशील कळविणे बंधनकारक आहे. अधिक माहितीकरीता जिल्हा कृषी विभागाशी संपर्क करण्याचे कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here